WPL Live Cricket Score, UPW vs GG Women’s Premier League 2024 : आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा आठवा सामना खेळला जात आहे. यूपीने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
गुजरात जायंट्सने निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावताना 142 धावा करताना यूपी वॉरियर्ससमोर 143 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात गुजरातने चांगली फलंदाजी केली. सलामीला आलेल्या लॉरा आणि बेथ मुनी यांच्यात पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली. 18 धावा करून कर्णधार मुनी बाद झाली. त्याचवेळी लॉराने 4 चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली हरलीन देओल 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला राजेश्वरी गायकवाडने अंजली सरवाणीच्या हातून झेलबाद केले.
Innings Break!#GG set a 🎯 of 143 for the UP Warriorz!
Will it be enough for #UPW? We’ll find out 🔜
Scorecard 💻📱https://t.co/4LUKvUMAOB#TATAWPL | #UPWvGG | @Giant_Cricket | @UPWarriorz pic.twitter.com/gF5mvqEGnn
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 1, 2024
यूपीविरुद्ध चौथ्या विकेटसाठी ऍशले गार्डनर आणि फोबी लिचफिल्डमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक्लेस्टोनने गार्डनरला बाद करून त्या भागीदारीचा शेवट केला. गार्डनर 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फोबीही धावबाद झाली. 26 चेंडूत 35 धावा करून ती पॅव्हेलियनमध्ये परतली. दयालन हेमलता 2 तर कॅथरीन ब्राइस 5 धावांवर या सामन्यात नाबाद राहिल्या.
युपी संघाकडून गोलंदाजीत सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तिने 4 षटकात 20 धावा दिल्या तर राजेश्वरी गायकवाडला एक विकेट मिळाली. तर एक फलंदाज धावबाद झाली.