WPL 2024 Most Sixes : महिला प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती सुरू आहे. जाणून घ्या… डब्लूपीएल 2024 (WPL 2024) मध्ये आतापर्यंत कोणत्या महिला क्रिकेटपटूने सर्वाधिक षटकार मारले आहेत.
महिला प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती सुरू आहे. 5 संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत आहे, प्रत्येक सामना दिवसागणिक महत्त्वाचा होत आहे. येथे आम्ही त्या टॉप 5 महिला क्रिकेटपटूंबद्दल सांगत आहोत, ज्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारी शफाली वर्मा आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणारी खेळाडू आहे. शेफालीने 5 सामन्यात 11 षटकार ठोकले असून ती यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, डब्लूआपीएलमधील 15 वा सामना दिल्ली विरूध्द यूपी यांच्यात सुरू असून या सामन्यानंतर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.
WPL 2024 Most Sixes : टॉप 5 महिला क्रिकेटपटू…
1. शेफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स) : 5 सामने 11 षटकार (156 धावा)
2. स्मृती मानधना (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) : 6 सामने 10 षटकार (243 धावा)
3. किरण नवगिरे (यूपी वॉरियर्स) : 6 सामने 7 षटकार (105 धावा)
4. ग्रेस हैरिस (यूपी वॉरियर्स) : 6 सामने 7 षटकार (173 धावा)
5. एलिस कैप्सी (दिल्ली कॅपिटल्स) : 5 सामने 5 षटकार (167 धावा)