चिंता वाढवणारी बातमी! राज्याला आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

तज्ज्ञांचा दिला इशारा

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता आता मात्र, करोना रुग्णसंख्या मागील आठवड्यापासून हळूहळू कमी होत आहे.  देशभरातील राज्यांपैकी महाराष्ट्रात  दीड कोटी लसी देण्याचा टप्पा पार केला आहे. इतक्या विक्रमी संख्येमध्ये लसीकरण करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. 

 मात्र राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आले, तर दुसरीकडे  महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या नऊ कोटी इतकी आहे मात्र लसीकरण केवळ दीड कोटी लोकांचं झालं आहे. ही संख्या खूप कमी आहे,” असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. पुढे बोलताना या अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील तिसऱ्या लाटेसंदर्भातील भीती व्यक्त केली.

यापूर्वी ही आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. तसेच या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं होत की,’करोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्‍यक आहे. त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. तिसऱ्या लाटेसाठी लसीकरण पुढे ढकलणे हे सुद्धा तिसरी लाट येण्यामागचे कारण ठरू शकते. 

दरम्यान , लसीकरण केंद्र वाढत असतानच दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक जिह्ल्यात होणारा लसींचा पुरवठा अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर दोन ते तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. लसीकरणामध्ये आपण एवढा वेळ घालवला तर करोना नवा विषाणू निर्माण होईल ज्याच्यावर लसीचा काही परिणाम होणार नाही,” असंही या वैज्ञानिकाने म्हटलं आहे. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.