राजगुरूनगर -खेड तालुक्यात मागील 24 तासांत 132 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 184 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बाधितांपेक्षा करोना मुक्त अधिक असल्याने तालुक्याला थोडा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात आतापर्यंत 18 हजार 774 जण पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यापैकी 17 हजार 276 जणांनी करोनावर मात केली आहे. 235 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात 857, चाकण 167, आळंदी 103, राजगुरूनगर 136 असे एकूण 1 हजार 263 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मागील 24 तासांत चाकण (26), राजगुरूनगर (7), आळंदी (6) या तीन नगरपरिषदांच्या हद्दीत 39. नाणेकरवाडी (14), मेदनकरवाडी (12), खराबवाडी (8), शिरोली (5), कडूस (4), कुरुळी, चिंबळी, सोळू (प्रत्येकी 3), आंबेठाण, गाडकवाडी, महाळुंगे इंगळे, साबुर्डी, खालुंब्रे, निघोजे, वाकी खुर्द (प्रत्येकी 2), आखारवाडी, आव्हाट, बहिरवाडी, बहुळ, भांबोली, चांदूस, चिंचोशी, देवोशी, धानोरे, गोसासी, कमान, खरपुडी बुद्रुक, मरकळ, मोई, मोहितेवाडी, नायफड, पाईट, रासे, सांडभोरवाडी, संतोषनगर, शेलू, शिंदे, शिवे, वरुडे, वासुली, वाडा, वाफगाव (प्रत्येकी 1) असे 93 एकूण 132 पॉझिटिव्ह आढळले.