बीजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा करोना विषाणूने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता पुन्हा चीनच्या शांघाई शहरात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. चिंता वाढवणारी बातमी म्हणजे चीनच्या शांघाई शहरात करोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
28 मार्च ला चीनमधील सगळ्यात मोठ्या शहरात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण वाढले ते आटोक्यात आणण्यासाठी तेथे दोन वेळा लॉकडाऊन देखील करण्यात आलं होतं.
दरम्यान, 17 एप्रिल रोजी शांघायमध्ये करोनाचे 19,831 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यापूर्वी शनिवारी 21,582 बाधीतांची नोंद झाली होती. मात्र, या लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसलेली नाहीत. त्याच वेळी, करोनाची लक्षणे असलेले 2,417 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि शनिवारी बाधीतांच्या 3238 प्रकरणांची भर पडली.
चीन मध्ये पुन्हा एकदा करोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्यामुळे सामान नागरिकांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे. चीन पाठोपाठ आता युरोप आणि अमेरिकेतील काही राज्यात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. सध्या चीनमधील परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे दिसून येते आहे.