मुंबई – अभिनेत्री सोनम कपूर आहुजा प्रेग्नंट असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सोनमने गरोदरपणाशी संबंधित तिचे अनुभव शेअर केले आहेत. सोनमने गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2022 मध्ये सोशल मीडियावर पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना ती गर्भवती असल्याची माहिती दिली होती. सोनमने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले असून मे 2022 मध्ये त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होतील.अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नन्सी दरम्यान तिला येत असलेल्या अनुभवांबद्दल सांगितले.
सोनम म्हणाली की, ‘प्रेग्नन्सीचा हा प्रवास खूप कठीण आहे. आई होण्याआधीच्या या प्रवासाबद्दल कोणी जास्त बोलत नाही. तुमचे शरीर दररोज बदलते. तुम्हाला नेहमी वेगळा अनुभव येतो. अनेक वेळा मला झोप लागत नव्हती कारण मला सारखं बाथरूमला जावे लागत होते. बऱ्याच वेळा मी दहा ते बारा तास झोपत होते. तेव्हा मला कोणीही डिस्टर्ब करत नव्हते. आई होणं हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे.’