जोहान्सबर्ग – हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिकेतील बोत्सवाना या देशांमध्ये तब्बल 1098 कॅरेटचा मोठा हिरा सापडला असून हा हिरा संबंधित कंपनीने राष्ट्रपतीना भेट दिला आहे.
बोत्स्वाना मधील हिऱ्यांच्या खाणी मध्ये कार्यरत असलेल्या देबस्वाना डायमंड कंपनीला हा 1098 कॅरेटचा मोठा हिरा सापडला. गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत प्रथमच एवढा मोठा हिरा या कंपनीला सापडला आहे.
आत्तापर्यंत सापडलेल्या मोठ्या हिऱ्यांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा जिर्स असून ते तीनही हिरे बोत्स्वाना या देशात सापडलेले आहेत. 1905 मध्ये आफ्रिकेत 3106 कॅरेटचा सर्वात मोठा हिरा सापडला होता.
या हिऱ्याला क्युरियन स्टोन असे नाव दिले होते. 2015 मध्ये अकराशे 9 कॅरेटचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हिरा सापडला. त्याचे नाव लिस्टरोना असे ठेवण्यात आले. आता हा 1098 कॅरेट चा तिसरा मोठा हिरा या कंपनीला सापडला आहे.
या हिऱ्याचे नामकरण अद्याप बाकी आहे. या हिऱ्याची लांबी 72 एम एम आणि रुंदी 52 एमएम आणि उंची 27 एम एम आहे. या कंपनीने हा हिरा बाजारात विक्रीला न आणता देशाच्या राष्ट्रपतीना भेट दिला आहे.