नवी दिल्ली – पाकिस्तानविरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) शानदार शतक झळकावले. त्याने 94 चेंडूत 108 धावांची खेळी खेळली. ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत 41 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंड संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.दुखापतीतून सावरल्यानंतर केन विल्यमसन प्लेइंग 11 मध्ये सामील झाला. फलंदाजी करताना केन विल्यमसनने ७९ चेंडूत ९५ धावांची शानदार खेळी केली. (Worldcup2024)
रचिन रवींद्रने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले
त्याचवेळी या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी खेळली. त्याने 94 चेंडूत 108 केल्या. त्याचवेळी ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत झटपट 41 धावा केल्या. या तिन्ही फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे किवी संघाने सहा गडी गमावून 401 धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर उभा केला. (NZvsPAK)
न्यूझीलंडने खास विक्रम केला
या सामन्यात न्यूझीलंड संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. किवी संघ उपांत्य फेरीत खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. न्यूझीलंडच्या वनडे इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2008 मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध 50 षटकांत 2 बाद 402 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानला पहिला धक्का
पाकिस्तानला पहिला धक्का सहा धावांवर बसला. टीम साऊदीने अब्दुल्ला शफीकला विल्यमसनकरवी झेलबाद केले. यावेळी विल्यमसनने अप्रतिम झेल घेतला. शफीकला चार धावा करता आल्या. सध्या फखर जमान आणि बाबर आझम क्रीजवर आहेत. तीन षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 10 धावा होती.