मुंबई :- भारताचा अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात संधी मिळणार असल्याचे संकेत निवड समितीने दिले आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्सर पटेल याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो या स्पर्धेपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होणार का, याबाबत अद्याप साशंकता निर्माण झाल्यामुळे अश्विनच्या नावावर पसंती दर्शवण्यात आली आहे.
त्यातच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अश्विनने पहिल्या दोन लढतीत अफलातून कामगिरी केल्यामुळे त्याच्या नावावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगितले जात आहे. आयसीसीने दिलेल्या वाढीव मुदतीनुसार येत्या 28 सप्टेंबरपर्यंत स्पर्धेतील सहभागी संघ आपल्या संघात काही बदल करू शकतात.
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक…
– 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
– 11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
– 14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
– 19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
– 22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
– 29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
– 2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
– 5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
– 12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलॅंड, बेंगळुरू
बीसीसीआयच्या निवड समितीने 5 सप्टेंबर रोजी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, कुलदीप यादव, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर, महंमद शमी, जसप्रीत बुमराह.