Ravichandran Ashwin wrote history in his milestone 100th Test : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इतिहास रचला. त्याने इंग्लिश संघाच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. आतापर्यंत कसोटीत त्याने 36 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी इतिहासात सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेणारा तो भारताचा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळेने ३५ वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. आपल्या पहिल्या आणि १०० व्या कसोटीत पाच बळी घेणारा अश्विन पहिला गोलंदाज आहे.
कसोटीत एका डावात सर्वाधिक पाच बळी
१. मुथय्या मुरलीधरन, श्रीलंका, १३३ कसोटीत ६७ वेळा
२. शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया, १४५ कसोटीत ३७ वेळा
३. रिचर्ड हॅडली, न्यूझीलंड, ८६ कसोटीत ३६ वेळा
४. आर अश्विन, भारत, १०० कसोटीत ३६ वेळा
५. अनिल कुंबळे, भारत, १३२ कसोटीत ३५ वेळा
WTC : जागतिक मालिकेत दहा वेळा पाच विकेट्स
अश्विनने पहिल्या डावात चार बळी घेतले होते आणि या कसोटीत एकूण नऊ विकेट्स घेतल्या आहेत. २०१९ मध्ये सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन आणि आश्विनने केली आहे. दोघांनीही दहा वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
जागतिक मालिकेत सर्वाधिक विकेट्समध्ये दुसरा
अश्विनने आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये १७४ बळी घेतले आहेत आणि यामध्ये सर्वाधिक बळींच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पॅट कमिन्सच्या नावावर १७२ विकेट आहेत. नॅथन लिऑनने डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर १८४ विकेट आहेत.
नॅथन लियॉन, ४३ सामने, १८४ बळी
आर अश्विन, ३५ सामने, १७४ बळी
पॅट कमिन्स, ४२ सामने, १७२ बळी
मिचेल स्टार्क, ३८ सामने, १४७ बळी
स्टुअर्ट ब्रॉड, ३३ सामने, १३४ बळी
१०० व्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरी…
अश्विनने या कसोटीच्या दोन्ही डावात मिळून नऊ विकेट घेतल्या आणि १२८ धावा दिल्या. एखाद्या खेळाडूची त्याच्या १०० व्या कसोटीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यात त्याने मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला. मुरलीधरनने 2006 मध्ये बांगलादेशविरुद्ध 100वी कसोटी खेळली होती. त्यानंतर त्याने चितगावमध्ये 141 धावांत नऊ विकेट घेतल्या.
IND vs ENG 5th Test : ‘रोहित शर्मां’चा आणखी एक विक्रम, ‘या’ बाबतीत ‘विव्ह रिचर्ड्स’शी साधली बरोबरी…
९-१२८ – रविचंद्रन अश्विन विरुद्ध इंग्लंड, धरमशाला, २०२४
९-१४१ – मुथय्या मुरलीधरन विरुद्ध बांगलादेश, चट्टोग्राम, २००६
८-२३१ – शेन वॉर्न विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केप टाउन, २००२
७-१५१ – कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, कराची, १९८९
७-१७१ – अनिल कुंबळे विरुद्ध श्रीलंका, अहमदाबाद, २००५
१०० व्या कसोटीत एका डावात पाच विकेट घेणारे गोलंदाज
६/१६१ – शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केप टाउन, २००२
५/८९ – अनिल कुंबळे (भारत) विरुद्ध श्रीलंका, अहमदाबाद, २००५
६/५४ – मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) विरुद्ध बांगलादेश, चट्टोग्राम, २००६
५/७७ – रविचंद्रन अश्विन (भारत) विरुद्ध इंग्लंड, धरमशाला, २०२४