नवी दिल्ली – मनीष सिसोदियांची दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठी आणि सर्वात नकारात्मक पार्टी पराभूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.ट्विटरवर त्यांनी दिल्लीकरांचे आभारही मानले आहेत. दिल्लीकरांनी कट्टर प्रामाणिक आणि काम करणारे नेते अरविंद केजरीवालांच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याने आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
Lok Sabha election 2024 : कॉंग्रेसशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही – के. सी. त्यागी
आमच्यासाठी हा केवळ एक विजय नाही तर एक मोठी जबाबदारी आहे, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. दिल्ली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याचा विषय खूपच गाजवण्यात आला होता. त्यात अनेक ठिकाणी छापेमारी करून अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते व यात मनीष सिसोदिया यांनाही चारही बाजूने घेरण्यात आले होते; परंतु त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा शेवटपर्यंत सापडला नाही.
हाच विषय या निवडणूक प्रचाराचाही मुद्दा करण्यात आला होता. तसेच आम आदमी पक्षाचे काही व्हिडिओही भाजपकडून व्हायरल करण्यात आले होते; परंतु या साऱ्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने दिल्लीतील कचऱ्याचे ढीग, सार्वजनिक अव्यवस्था असे सारे विषय जनतेपुढे मांडून त्यावर आम्हीच प्रभावी उपाययोजना करू, अशी ग्वाही दिली. त्याला जनतेने प्रतिसाद दिल्याचे मानले जाते.