पाकिस्तानातील मोठा आर्थिक घोटाळा जागतिक बॅंकेकडून उघड

इस्नामाबाद – जागतिक बॅंकेने पाकिस्तानातील काही कंपन्यांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. कंत्राटे मिळवण्यासाठी भ्रष्टाचार, लाचखोरी, सामुदायिक गैरव्यवहार आणि दडपशाहीचा अवलंब या कंपन्याकडून केला जात होता, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.

डिस्ट्रीब्युशन कंपनीज आणि नॅशनल ट्रान्समिशन ऍन्ड डिस्पॅच कंपनीने हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. या कंपन्यांनी परस्पर लाभासाठी संगनमत केल्याचे वर्ल्ड बॅंक ग्रुप आणि इंटिग्रीटी व्हाईस प्रेसिडेन्सीने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.

जागतिक बॅंकेच्या रिडेव्हलपमेंट विभागाने पाकिस्तान सरकारबरोबर 2008 च्या जुलैमध्ये एक कर्ज विषयक करार केला होता. यामध्ये वीज वितरण आणि विजेच्या ट्रान्समिशन संदर्भातील फेररचना करण्यात येणार होती. या प्रकल्पाला दोन आंतरराष्ट्रीय संस्थाकडून पतहमी देण्यात आली होती. या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांनी कंत्राट मिळवण्यासाठी बाजारपेठेवर नियंत्रण केले होते.

काही निवडक कंपन्यांनी जागतिक बॅंकेचा वित्तपुरठा असलेल्या या प्रकल्पांचे कंत्राट मिळण्यासाठी हे व्यापक संगनमत केले होते. या व्यापक गैरव्यवहारामध्ये पाकिस्तानी प्रशासनाचाही हात असल्याचे उघड आहे.

या व्यापक गैरव्यवहारामुळे समप्रमाणात वित्तपुरवठा करण्याच्या आंतरराष्ट्रीय हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. यासंदर्भात या कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नियंत्रित असलेल्या कोणत्याही संस्थांवर निर्बंध जागतिक बॅंकेने लागू केले आहेत. मात्र पाकिस्तानमधील कोणत्याही प्रकल्पाला मान्यता देण्यापूर्वी जागतिक बॅंकेला फेरविचार करावा लागणार आहे.
आपल्याशी संलग्न असलेल्या संस्थांवर प्रशासकीय निर्बंध आणले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.