कोल्हापूर – करवीर तालुक्यातील परिते येथील बेकायदेशीर गर्भलिंगनिदान सेंटर प्रकरणी एका महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित राणी कांबळेला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. परिते येथील गर्भलिंगनिदान सेंटरवर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी छापा टाकला होता.
पोलिसांचा छापा पडताच राणी कांबळे पसार झाली होती. यानंतर तिला अटक करण्यात आली असून तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे, असे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी सांगितले.