बारामती,(प्रतिनिधी)- विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए (सीए) विभागाने स्प्रिंग आणि हायबरनेटवर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेचे प्रमुख उद्देश विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि रिजेक्स टेक्नोलॉजीज प्रा. लि. फलटण- बारामती यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत विविध उपक्रम घेण्याचा आहे. इंद्रजीत धालपे आणि रुपेश गंगतिरे, रिजेक्स टेक्नोलॉजीज यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये जावा प्रोग्रामिंग भाषेतील स्प्रिंग आणि हायबरनेट या फ्रेमवर्कच्या माहिती देण्याचच प्रयत्न करण्यात आला.
कार्यशाळेत एकूण 69 विद्यार्थी उपस्थित होते. यात स्प्रिंग आणि हायबरनेट विविध प्रकारांचे, त्यांच्या वैशिष्ट्ये, वापराचे विधान आणि प्रोग्रामिंग प्रकल्पांत कसे वापरता येतात याबद्दल चर्चा केली. विद्यार्थ्यांना कार्यशाळेत प्रात्यक्षिक स्वरूपात प्रोग्रामिंग करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी अशा नवनवीन कौशल्य शिकून आपल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव अग्रही राहिले पाहिजे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, विभागप्रमुख महेश पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेचे समन्वय सलमा शेख यांनी केले. सूत्रसंचालन पूनम गुंजवटे यांनी केले. अनिल काळोखे व वैशाली पेंढारकर यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशाल शिंदे, अक्षय भोसले, कांचन खिरे आणि अक्षय शिंदे यांचे सहकार्य मिळाले. .