पर्यटनवृद्धीसाठी “गुडविल ऍम्बेसिडर’ म्हणून काम करा!

पायऱ्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवा

पर्यटन मंत्री जयकुमार रावल : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना केले आवाहनकार्ला एकविरा देवी मंदिर व कार्ला लेणी वर जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून तीन कोटी रुपये निधी पर्यटन मंत्रालयाकडून वर्ग करण्यात येईल याचा प्रस्ताव लवकरात लवकर भारतीय पुरातत्व विभागाला देण्यात यावा, अशा सूचना प्रादेशिक संचालक दीपक हर्णे यांना पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी दिल्या

कार्ला – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. अशा स्थळांच्या पर्यटनवृद्धीसाठी सक्षम विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर पर्यटन “गुडविल ऍम्बेसिडर’ म्हणून जोमाने काम करावे, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना केले.

कार्ला येथील पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासावर राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांची राज्यातील पर्यटन विकासावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत पर्यटनाच्या बाबतीत सर्वस्पर्शी विषयावर पर्यटन मंत्री रावल यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाचे संचालक दिलीप गावडे, अभिमन्यू काळे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, संजीव कुमार, पुणे प्रादेशिक संचालक दीपक हर्णे, कार्यकारी अभियंता विनय बावधने, शिप्रा वोरा, कार्ला व्यवस्थापक महादेव हिरवे व राज्यातील विविध जिल्ह्यातील अप्पर आयुक्त उपस्थित होते.

रावल म्हणाले, पर्यटन हे व्यापक रोजगार निर्मितीचे क्षेत्र आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण होणार आहे. विविध फेस्टिव्हल आयोजन करून पर्यटनाला चालना व पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती होत आहे. अनेक तरुणांना या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाढत्या पर्यटन विकासाबरोबरच पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही वाढत आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधा निर्मितीवर ही भर द्यावा लागेल. तसेच राज्यातील शाश्‍वत पर्यटन विकासासाठी व महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी सर्वस्पर्शी समन्वयाने प्रयत्न करावे, या पुढे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत मंजुरी जिल्हा पर्यटन विकास अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असेल, असे ही ते या वेळी म्हणाले.

दुसऱ्या सत्रात रावल यांनी जिल्हा स्तरावर पर्यटन विषयक माहिती एकत्रित करून मॅप तयार करणे, राज्यस्तरावर पर्यटन विषयक विस्तृत माहिती पाठवणे, जिल्ह्यात पर्यटन महोत्सव घेणे, जिल्हा नियोजन विभागातील पर्यटन निधी वापरणेसाठी पर्यटन स्थळे सुचवणे, वर्षातून एक कॉन्फरन्स आदी बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. यावेळी प्रादेशिक पर्यटन धोरणाचे सादरीकरण संचालक दिलीप गावडे यांनी केले. सादरीकरणात जगात-देशात पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचे स्थान, पर्यटन निवास, मंजूर कामांची संख्या, प्रादेशिक पर्यटन योजनेची माहिती देण्यात आली. आयुक्त दीपक म्हैसकर, इस्कॉनचे गोरांगदास प्रभू, सगुणा बागेचे चंद्रशेखर भडसावळे, मनोज हाडवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)