वाळू चोरांकडून 32 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक

शेवगाव: पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार शेवगाव पोलिसांनी वाळू चोरांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेचा भाग म्हणून, तालुक्‍यातील मुंगी व इतर ठिकाणाहून वाळू वाहतूक करणारे पाच ट्रॅक्‍टर व दोन डंपर शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एकूण 32 लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

या परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी दि. 24 व 25 रोजी विशेष पथकाची नेमणूक केली होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक इशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपनिरीक्षक भरत काळे, सहाय्यक फौजदार खेडकर पोलीस नाईक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, संदीप दरवडे यांच्या पथकाने केली केली आहे. या कारवाईत मुंगी, वडूले व भगूर नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारे 5 ट्रॅक्‍टर व 2 डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईत सोमनाथ गोरडे, अविनाश सगळे, बबलू उर्फ अविनाश मिसाळ, बाळासाहेब हिंगे ( सर्व रा. मुंगी), अन्वर हमिद शेख, अर्शद इस्माईल शेख (दोघे रा.राक्षी) बाळु पुरनाळे (भगुर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)