India Vs Australia 3rd ODI Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवाताना 338 धाव करत भारतासमोर 339 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फोब लेचफिल्डने कर्णधार हिलीसह 189 धावांची भक्कम सलामी दिली. या दोघींनी भारतीय गोलंदाजी फोडून काढली. या दोघंनी आपापली अर्धशतके फटकावली. हिली शतकाकडे कूच करत असतानाच 82 धावांवर बाद झाली. तीने या खेळीत 85 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार फटकावले.
लेचफिल्डने मात्र आपले शतक साकार केले. मात्र, शतक पूर्ण झाल्यावर ती 119 धावांवर माघारी परतली तिने या खेळीत 128 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार व 1 षटकार खेचला. एलीस पेरीने थोडीफार चमक दाखवताना संघाचे द्विशतक फलकावर लावले. मात्र, ती बाद झाल्यावर भरात असलेल्या बेथ मुनी व ताहिला मॅकग्रा यांनी साफ निराशा केली. अश्ले गार्डनर व अनाबेल सदरलॅंड यांनी जबाबदारीने फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. गार्डनर 30 तर सदरलॅंड 23 धावा करून बाद झाल्या. त्यानंतर अलाना किंगने नाबाद 26 धावांची खेळी करताना जॉर्जिया वेरहॅमच्या साथीत संघाला त्रिशतकी धावांपेक्षा जास्त मोठी मजल मारून दिली. वेरहॅमने नाबाद 11 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 338 अशी भक्कम धावसंख्या उभारली. भारताच्या गोलंदाजांनी तब्बल 28 अवांतर धावा देत त्यांच्या धावसंख्येला हातभार लावला.
Innings Break!
Australia post 338/7 on the board.
3⃣ wickets for @shreyanka_patil
2⃣ wickets for Amanjot Kaur
1⃣ wicket each for @Deepti_Sharma06 & @Vastrakarp25Over to our batters now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/XFE9a14lAW #TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PR486mEcrU
— BCCI Women (@BCCIWomen) January 2, 2024
भारतीय संघाकडून श्रेयंका पाटीलने तीन आणि अमनजोत कौरने दोन गडी बाद केले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, या दोन संघात सुरु असलेल्या या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी अभेद्य विजयी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. भारतीय संघाचा विजयासह मालिका संपवण्याचा प्रयत्न असेल तर कांगारूचा संघ शेवटचा सामना जिंकून मालिका 3-0 ने आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
.