श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – आज देशात विविध क्षेत्रात युवती व महिला आघाडीवर आहेत. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातही महिलांनी सहभागी होऊन सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी केले.
जिजामाता चौक येथील शिवालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त युवा सेनेच्या मेळाव्यात महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवरुखकर बोलत होत्या.यावेळी त्यांनी विविध कार्यात अग्रेसर व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची माहिती दिली. याप्रसंगी देवरुखकर व युवती सेना विस्तारक श्रुतिका मोरे यांचा सत्कार युवती सेना जिल्हाप्रमुख नेहा लुंड यांच्याहस्ते करण्यात आला.
महिला दिनानिमित्त प्रमिला खाडे, गौरी जाधव, सृष्टी कांगुणे, भारती मगर, मनीषा जोगदंड, प्रतिभा सातपुते, गायत्री साळुंके, निकिता शहाणे, शुभांगी वाघमारे, काव्या पटारे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवा सेनेचे तालुका प्रमुख सुरेश थोरे, युवा सेना तालुका प्रमुख सचिन कर्पे, युवा सेना शहरप्रमुख सिद्धांत छल्लारे, उमेश छल्लारे, विशाल दुपाटी, दत्ता करडे, पवन सूर्यवंशी, प्रकाश परदेशी, प्रतीक यादव आदी उपस्थित होते.