यशस्वी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार लैला शेख यांना निवेदन…
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील महिलांना व महिला बचत गटांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीत व शिरूर तालुक्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आज शिरूर तालुका यशस्वी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने तहसीलदार लैला शेख यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी औद्योगिक क्षेत्रात स्थानिक बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार या आदेशानुसार स्थानिक महिला बचत गटांना रोजगार योजनेत समाविष्ट करावे असे आदेशही दिले आहेत. त्यानुसार शिरूर तालुक्यातील महिलांना औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
“शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट असून या बचत गटातील अनेक महिलांना विविध प्रशिक्षण दिलेले आहेत याचा फायदा रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करताना होणार असून स्थानिक तरुणांना बरोबर महिलांनाही औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करून द्यावा.
-नम्रता गवारी (सचिव यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन, शिरूर तालुका)
याबाबत शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार लैला शेख यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या सचिव नम्रता गवारी, पुष्पा जाधव, शारदा भुजबळ, ज्योती गेजगे, प्रियंका अभंग उपस्थित होत्या.
जगावर कोरोनाची महाभयंकर संकट निर्माण झाले आहे. आपल्या देशात बेकारी निर्माण झालेली आहे. छोटे-मोठे उद्योग बंद झालेले आहे तरी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची एमआयडीसी मध्ये आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांनी धाडसी पाऊल उचलले आहे .
या औद्योगिक वसाहतींमध्ये महिलांनाही ही रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी महिला बचत गट यांनाही रोजगार उपलब्ध करावा. यासाठी यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने अनेक महिलांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण पण हि दिलेले आहेत. अशा महिलांना औद्योगिक वसाहतीत कंपन्यांमध्ये सामावून घेता येईल. असे या निवेदनात म्हटले आहे.