ब्रुसेल्स (बेल्जियम) – पाकिस्तानमध्ये सातत्याने महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत युरोपिय संघातील काही सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
सप्टेंबरमध्ये लाहोर शहरात चालत्या वाहनात आपल्याच मुलांसमोर एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. या घटनेवरून लाहोरच्या पोलिसांनी दिलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला होता.
सोमवारी युरोपिय संघामध्ये विदेश व्यवहार विषयीच्या उच्चस्तरिय प्रतिनिधी आणि आयुक्तांच्या बैठकीचे उपाध्यक्ष जोसेफ बोरेल यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधले. युरोपिय प्रतिनिधी मंडळाच्या पाकिस्तानमधील प्रमुखांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
याबाबतचे वृत्त 13 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. युरोपिय संघाने 28 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे निवेदन प्रसिद्धीस देऊन पाकिस्तानमधील घटनेचा निषेध केला होता.
युरोपिय संघातील सदस्या समिरा राफेल, करेन माल्चिओर, अबीर अल सहलानी, राडका माक्सोवा, साल्वी ब्रुनेट, आयरेन टोलेरेट आणि अन्य काही नव्याने नियुक्त झालेल्या संसद सदस्यांनी युरोपिय संघाच्या उच्चस्तरिय प्रतिनिधींच्या बैठकीच्या उपाध्यक्षांकडे या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
पाकिस्तानकडे या प्रकरणी निषेध नोंदवला जाअव आणि चौकशीस्ठी पाठपुरावा केला जावा, अशी मागणीही या संसद सदस्यांनी केली आहे.