मुंबई- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सगळेच कलाकार दिवाळी अगदी उत्साहात साजरी करतात. मात्र यावर्षीची सोनालीची दिवाळी मात्र पाणावलेली होती. सोनालीचा साखरपुडा झाला आहे. येत्या वर्षात तिचा विवाह होणार आहे त्यामुळे तिची माहेरची शेवटची दिवाळी आहे.
‘माहेरची सरती दिवाळी’ असं भावनिक कॅप्शन देत तिने दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनीही भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहे. अशी दिवाळी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो असं एका चाहत्याने लिहिलं आहे.
आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने सोनालीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. लग्नाच्या आणि प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत तिने साखरपुडा झाल्यानंतर आपल्या जोडीदाराविषयी आपल्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली होती.
दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर याच्याशी सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. दरम्यान, साखरपुडा, लग्न हे सोहळे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतात. या खास सोहळ्यांसाठी साजश्रृंगारसुद्धा तसाच केला जातो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
View this post on Instagram