वाघोली – महिलांनी संघटित होऊन स्पर्धेच्या युगात आधुनिक ज्ञान घेऊन व्यवसायभिमुख प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होणे आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी केले. वाघोली तालुका हवेली येथे महिला दिनानिमित्त विविध कला कौशल्य यात नेत्रदीपक यश मिळवलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी जयश्री राजेंद्र सातव पाटील बोलत होत्या.
यावेळी महिलांना विविध कला गुणांत नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल मान्यवर महिलांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुष्पा जगताप, दिपाली जाधव, सोनल मोरे, प्रियांका जाधव, स्वाती शिंपी, ललिता सुतार, सुवर्णा खेडेकर, नम्रता कुरा, रजनी सातव, रोहिणी सातव, शशिकला शिंदे, अक्षदा शिंदे, प्राजक्ता सातव,रचना सातव, पूजा आडसरे, विद्या बाबर, कल्पना मिसाळ,
स्मिता शिरसागर, अर्जुन शिरसाट, अर्चना शिरसाट, मनीषा पाचारणे, मनीषा जाधव, छाया बहिरट,
वैशाली बहिरट, शोभा गाढवे, चैत्राली जगताप, अपर्णा बहिरट, मीरा सातव, शितल तोषनीवाल, सपना तोषनीवाल, अनिता तोषनीवाल आदी महिला उपस्थित होत्या.