भोसरी, (वार्ताहर) – स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांनी शारीरिक काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला शाळेतील सर्व पदाधिकारी व शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमांर्गत स्त्रियांनी घ्यावयाची शारीरिक काळजी व त्वचेची निगा या महिलांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर ऊहापोह करण्यात आला. यासाठी स्किल इंडिया अंतर्गत कार्यरत असणार्या रुचिका कुलकर्णी, शार्दूला कुलकर्णी व स्वाती देशपांडे यांनी महिलांनी आरोग्याची व त्वचेची काळजी कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिके दाखविली.
या वेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक कविता कडू म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी महिला सक्षम आहेत. त्या खंबीरपणे संसार व नोकरी दोन्ही चाणाक्षपणे सांभाळत असतात. तर संस्थेच्या विश्वस्त सरिता विखे यांच्या मते यश मिळवण्यासाठी कौशल्य व चांगले व्यक्तिमत्त्व याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. यात महिलांनी पारंगत व्हावे.
या वेळी विनायक भोंगाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या उपमुख्याध्यपिका प्रिया नेवाळे व पदाधिकारी उपस्थित होते.