शिक्रापूर, (वार्ताहर)- महिला तसेच अनाथांसाठी विशेष कार्य करणाऱ्या माहेर संस्थेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करीत महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बालकांच्या विविध नृत्यांचे सादरीकरण केले. यावेळी महिला मेळाव्यास प्रतिसाद मिळाला.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका लूसी कुरियन यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला मेळावा पार पडला. यावेळी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच अंजली शिवले, व्याख्याते जगदीश ओहोळ, अर्चना कोकरे, शिवव्याख्याते सुचिता भिसे,
ओबीसी माळी महासंघाच्या अध्यक्षा शितल कापरे, आपटीच्या सरपंच सुनीता शिवले, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती संजीवनी कापरे, माहेर संस्थेच्या अध्यक्षा हीराबेगम मुल्ला, व्यवस्थापक शरली अँथोनी महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले. मीरा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तेजस्विनी पवार यांनी आभार मानले.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळवलेल्या श्रद्धा शेंगदाणे, इंग्लिश मीडियम स्कूल चालवणाऱ्या विद्या कनमोसे, महिलांना विविध प्रशिक्षण देणाऱ्या मंगला गरजे, सुषमा जाधव, पोलीस विभागात दाखल माहेर संस्थेची मुलगी वृषाली भागवत, हर्षा शितोळे आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माहेर संस्थेतील बालकांनी प्रार्थना नृत्य सादर केले.