पिंपरी (पुणे) – क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका महिलेची 27 लाख 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 मार्च ते 29 मार्च या कालावधीत बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार +62 85760134280 या क्रमांकावरून व्हाटस ऍप, टेलिग्रामवरून संवाद साधणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी महिलेने फिर्यादीस व्हाटसअप आणि टेलिग्राम या सोशल मीडियावर मेसेज करून क्रिप्टो करन्सीमध्ये शॉर्ट प्रीपेड प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांचा ट्रेड चुकल्याचे सांगून दंड, इन्कम टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून 27 लाख 500 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.