पिंपरी – बस प्रवासादरम्यान चोरट्याने पाच लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे चार तोळे 62 ग्रॅम वजनाचे दागिने असलेली पर्स चोरुन नेली. ही घटना 15 ते 16 मेदरम्यान रात्री पावणे बारा ते दुपारी चारदरम्यान गुजरातमधील सुरत ते मोशी बस प्रवासादरम्यान घडली.
याप्रकरणी मोहनसिंग पदमसिंग राजपुत (वय 31, रा. जलवायु विहार, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. राजपुत हे सहकुटंब सूरत येथून निगडी येथे जाणाऱ्या बसमध्ये (क्र. जीजे 05 बीएक्स 9222) मधून प्रवास करत होते. या प्रवासारम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून पाच लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे चार तोळे 62 ग्रॅम वजनाचे दागिने असलेली पर्स चोरली.