नवी मुंबई – नवी मुंबईतील कळंबोली येथील रोडपाली मध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराने केला 26 वर्षीय बारबालेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. हा खून सदर बारबालेच्या बांगलादेशी प्रियकराने केल्याचे समजते. लिपी शेख असे खून झालेल्या बारबालेचे नाव आहे.
काजल लाले, सलमा मिया व लिपी शेख या तिघी रहात रोडपाली कळंबोली येथे भाड्याने घर घेऊन राहत होत्या. काजल आणि सलमा या काही दिवसांसाठी गावी गेल्या होत्या, तेथून त्या पुन्हा रोडपाली येथील घरी आल्या असता, घराला बाहेरून टाळे होते. त्यामुळे त्यांनी घरमालक अक्षय गायकवाड यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता, लिपी शेख (26)या बांगलादेशी बारबालेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या संदर्भात अक्षय याने कळंबोली पोलीसांना कळविले व याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या खुनाच्या तपासादरम्यान कळंबोली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती मिळवून आरोपीचा शोध लावला. तो मुंब्रा येथे राहत होता. मुळचा बांगलादेशी असलेला आरोपी खुनाच्या घटनेनंतर फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने लिपी हिचे अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध होते, याचाच राग मनात धरून खून केल्याची कबुली दिली. कळंबोली पोलिसांनी या 24 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.