Ind vs Wi 1st T20 : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जात आहे.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली आहे.
वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 48 धावा केल्या आहेत. त्याचवेळी निकोलस पूरनने 41 धावांची खेळी केली. ब्रेंडन किंगने 28 धावांचे योगदान दिले.
भारताकडून युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी दोन बळी घेतले तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.