लखनौ : एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तान दरम्यान आजपासून एकमेव कसोटी सामन्यास लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट मैदानावर सुरूवात झाली आहे. वेस्टइंडिजने पहिल्या डावात आफगाणिस्तानला १८७ धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या विडींजने दुस-या दिवसअखेर २ बाद ६८ अशी मजल मारली असून अजूनही ते ११९ धावांनी पिछाडीवर आहेत. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शमर ब्रुक्स १९ आणि जाॅन कैंपबेल नाबाद ३० धावांवर खेळत होते.
Stumps
Day-1 #AFGvWI #LucknowTest pic.twitter.com/M8mfkDxtuO— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 27, 2019
वेस्टइंडिजची पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. विडींजचा सलामीवीर क्रैग ब्राथवेट ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला शाइ होपही ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कैंपबेल आणि शमर ब्रूक्सने ३४ धावांची भागिदारी करत दिवसअखेर संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. अफगाणिस्तानकडून आमिर हमजा आणि राशिद खानने प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजने अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. रहकेम काॅर्नवालने इब्राहिम जदरानला १७ धावांवर जेसन होल्डरकरवी झेलबाद करत पहिला झटका दिला. त्यानंतर जावेद अहमदी आणि इहसानुल्लाह यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी दुस-या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी केली, पण जोमेल वाॅरिकनने अहमदीला ३९ वर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अफसर जजई ३२, आमिर हमजा ३४ आणि इहसानुल्लाह २४ यांच्याशिवाय एकही फलंदाज मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही आणि अफगाणिस्तानचा पहिला डाव १८७ धावसंख्येवर आटोपला.
https://twitter.com/ACBofficials/status/1199622865798217729?ref_src=twcamp%5Ecopy%7Ctwsrc%5Eandroid%7Ctwgr%5Ecopy%7Ctwcon%5E7090%7Ctwterm%5E3
वेस्टइंडिजकडून रहकेम काॅर्नवालने २५.३ षटकांत ७५ धावा देत सर्वाधिक ७ गडी बाद केले. तर जेसन होल्डरने २ आणि जोमेल वाॅरिकनने १ गडी बाद केला.