वाढ न करता महापालिकेने वाघोलीत प्रॉपर्टी टॅक्स घेण्यास केली सुरुवात

ग्रामपंचायतनुसार टॅक्स भारता येणार ; मिळकतधारकांना दिलासा

वाघोली : महापालिकेने वाघोलीतून प्रॉपर्टी टॅक्स घेण्यास सुरुवात केली असून चालू वर्षात मिळकतधारकांना कोणताही वाढीव टॅक्स भरावा लागणार नसून ग्रामपंचायत असतानाची प्रॉपर्टी टॅक्सची रक्कमच भरावी लागणार आहे. वाघोली महापालिका (पूर्वीचे ग्रामपंचायत) कार्यालयामध्ये कॅश किंवा चेक स्वरूपात नागरिकांना टॅक्स भारता येईल.  

वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर तात्काळ टॅक्समध्ये वाढ होईल अशी धारणा नागरिकांची होती मात्र महापालिकेने चालू २०२१-२२ या वर्षात ग्रामपंचायत मध्ये आकारल्या जाणाऱ्या टॅक्सनुसार वसुली मोहीम हाती घेतली आहे. चालू वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

वाघोलीतील मिळकतधारकांना प्रॉपर्टी टॅक्स भरावयाचा असल्यास महापालिका (पूर्वीचे ग्रामपंचायत) कार्यालयामध्ये टॅक्स भरता येणार आहे. सध्या कॅश किंवा चेक स्वरूपात टॅक्स स्वीकारला जात असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने टॅक्स भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती वाघोली कार्यालय अधीक्षक संजय शिवले यांनी दिली.

पुढील वर्षापासून प्रॉपर्टी टॅक्स वाढणार?

महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने समाविष्ट गावातील प्रॉपर्टी टॅक्स ग्रामपंचायतीच्या चालू वर्षात आकारल्या जाणाऱ्या टॅक्स नुसार जमा करण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढील आर्थिक वर्षापासून महापालिकेच्या दराने बांधकामानुसार टॅक्स आकारला जाणार आहे. यावर्षी प्रॉपर्टी टॅक्समध्ये वाढ होणार नसली तरी पुढील वर्षापासून प्रॉपर्टी टॅक्स वाढणार हे नक्की.

वाघोलीतील मिळकतधारकांना प्रॉपर्टी टॅक्स भरावयाचा असल्यास महापालिका (पूर्वीचे ग्रामपंचायत) कार्यालयामध्ये टॅक्स भरता येणार आहे. सध्या कॅश किंवा चेक स्वरूपात टॅक्स स्वीकारला जात असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने टॅक्स भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा.

समीर भाडळे, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली

वाघोलीतील एकूण मिळकतधारक : ४१५५७

जमा टॅक्स : जवळपास ८ कोटी

थकबाकी : जवळपास ३५ कोटी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.