इराणमध्ये जननदर घटल्याने चिंता; विवाहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ॲप लॉन्च

तेहरान : कट्टर इस्लामिक देश असलेल्या इराणमध्ये गेल्या काही वर्षात जननदर मोठ्या प्रमाणावर घटला असून आता इराणमध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी विवाहाचे प्रमाण वाढावे म्हणून विशेष ॲप लॉन्च करण्यात आले आहे.

इस्लामिक राष्ट्र असल्यामुळे इराणमध्ये अशा प्रकारचे कोणतेही विवाह जमवणारे ॲप लॉन्च करण्यास यापूर्वी विरोध होत होता. पण आता हमदम नावाचे ॲप काही दिवसापूर्वी लॉंच करण्यात आले असून या ॲपच्या मदतीने विवाह जमावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या ॲपच्या मदतीने विवाहेच्छू वर किंवा वधू यांची माहिती प्रसारीत केली जात असून त्यांच्या कुटुंबाचे माहितीही या ॲपमध्ये देण्यात येत आहे.

हे ॲप संपूर्णपणे सरकारी योजनेचा भाग म्हणून तयार करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी या ॲपचा वापर करावा म्हणून जाहिरातही करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून विवाह जमलेल्या जोडप्यांनी लग्नानंतर चार वर्ष या अपशी संपर्क ठेवायचा आहे अशीही अट घालण्यात आली आहे.

इराणमधील इस्लामी कायद्याप्रमाणे पाश्चिमात्य देशांप्रमाणे कोणत्या प्रकारच्या डेटिंगला प्रतिबंध करण्यात आला असला तरी तेथील युवा वर्ग मात्र पारंपरिक पद्धतीने विवाह करण्यास तयार नाहीत. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमधील इराणमधील महिलांचा प्रजनन दर 25 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे सरकारने आता काही बाबतीत सवलती देण्याचा विचार सुरू केला आहे.

2015 मध्ये इराणचे सुप्रेमे लीडर आयातोल्लाह खोमेईनी यांनी एक आदेश जाहीर करून इराणमधील लोकसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची घोषणा केली होती. इराणमध्ये विवाह करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि जननदर वाढवण्यासाठी कर्जाची आणि आर्थिक सहाय्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.