विप्रोचे कोविड हॉस्पिटल दि.3 पासून सेवेत

पुणे – जिल्ह्याच्या 13 तालुक्‍यांत 33 कोविड केअर सेंटर (सीसीसी) असून उपलब्ध खाटांची संख्या 3 हजार 880 इतकी आहे. कोविड रुग्णालये 21 असून उपलब्ध खाटांची संख्या 1 हजार 181 इतकी आहे. तर भविष्यात 18 कोविड केअर सेंटर आणि 4 हजार 682 खाटा, 28 कोविड रुग्णालये आणि 1 हजार 830 खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

विप्रो हिंजवडी हॉस्पिटल येथे 450 खाटांचे नियोजन आहे. हे हॉस्पिटल 3 जूनपासून कार्यरत होईल, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मर्सिडीज म्हाळुंगे इंगळे हॉस्पिटलमध्ये 1 हजार 408 खाटा असून सध्या 40 रुग्ण दाखल आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष (स्पेशल कंट्रोल रुम) स्थापन करण्यात आला आहे. त्याचा टोल फ्री क्रमांक 1800-233-4130 असा असून एकूण 15 लाइन्स उपलब्ध आहेत. यावर आतापर्यंत 23 हजार 830 नागरिकांनी कॉल करुन माहिती घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.