मुंबई – करोना महामारीनंतर राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनी नागपूरात पार पडणार आहे. या अधिवेशनाला सोमवार, दि. 19 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून ते 30 डिसेंबरपर्यत चालणार आहे. शिवसेनेतील फूटीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महापुरुषांबाबतची अपमानास्पद वक्तव्ये, राज्यपालांचा राजीनामा, महिला सुरक्षा यावरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमकतेला आता नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार कसं तोंड देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधानपरिषदेतील बैठकांबाबत संसदीय कार्य विभागाचे सहसचिव अ.ग. वैद्य यांनी तात्पुरते वेळापत्रक जारी केले आहे.
MVA Mahamorcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला सर्शत परवानगी, पोलिसांनी दिले ‘हे’ निर्देश
या अधिवेशनाचे नियोजन जवळपास 14 दिवसांचे आहे. मात्र 24, 25 डिसेंबर अनुक्रमे शनिवारी, रविवार असल्याने कामकाजास सुट्टी असेल, तर पुढे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी देखील रविवार, शनिवार असल्याने कामकाजास सुट्टी असेल. त्यामुळे एकूण 10 दिवस दोन्ही सभागृहांचे नियोजित कामकाज पार पडेल.