#CWC19 : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

टॉटन – विश्‍वचषकाच्या सुरुवातीपासूनच कोणत्याही संघाला पराभवाचा धक्‍का देण्याची ताकद ठेवणारे संघ म्हणून परिचित असणारे बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे संघ आज समोरासमोर असणार आहेत. मात्र, आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघातील वेगवान गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांची परीक्षा होणार हे नक्‍की.

विश्वचषकातील वेस्टइंडिज वि. बांगलादेश या सामन्यास थोड्याच वेळात टॉटन येथील काउंटी मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला आहे. बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझा याने क्षेत्ररक्षण स्विकारून वेस्टइंडिजला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्‍का देत सकारात्मक केली होती. तर, वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत धडाक्‍यात सुरूवात केली. मात्र, यानंतर दोन्ही संघांना पुन्हा विजय मिळवण्यात अपयश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.