पुणे – ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे गेल्या २ महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या ‘प्युअर लक फेस्ट’ मोहिमेचा समारोप नागपूरच्या रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ब्रँडतर्फे १ एप्रिल २०२२ ते ३१ मे २०२२ दरम्यान नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, बार्शी, सांगोला, श्रीरामपूर, नांदेड, चंद्रपूर, बारामती आणि लातूर येथील दालनांमध्ये ‘प्युअर लक फेस्ट’ ही मोहीम राबविण्यात आली होती. उत्सवकाळात केलेल्या खरेदीवर प्रश्नमंजुषेनंतरच्या लकी ड्रॉच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक बक्षीसे मिळावीत, हा या मोहिमेचा उद्देश होता.
या स्पर्धेत २० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांची घोषणा सिम्बायोसिस इंटरनॅशनलच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांच्या हस्ते ४ जून रोजी पुण्यात करण्यात आली. बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन यांनी ‘प्युअर लक फेस्ट’चे नागपूर येथील विजेते चंद्रकांत खाडगे यांना नवीन होंडा सिटी कारच्या चाव्या सुपूर्द केल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून इतर १५ भाग्यवान विजेत्यांनी सुझुकी अवेनिस बाईक्स जिंकल्या.
‘पीएनजी ज्वेलर्स’च्या ग्राहकांतर्फे नागपूर येथे रविना टंडन यांच्या हस्ते आणि इतर १५० ग्राहकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात फॅशन शोचा देखील समावेश होता. यावेळी रविना टंडन यांनी ग्राहक आणि पारितोषिक विजेत्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “समृद्ध परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्ससारख्या ब्रँडबरोबर माझ्या असलेल्या सहयोगाबाबत मला अत्यंत आनंद होत आहे. नागपुरातील तसेच महाराष्ट्रातून आलेल्या सर्व ग्राहकांशी संवाद साधणे, हा एक अत्यंत आनंददायी अनुभव होता आणि पुन्हा इथे येण्याची मला आशा आहे. सर्व पारितोषिक विजेत्यांना माझ्या शुभेच्छा.”
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, “प्युअर लक फेस्टला एप्रिल आणि मे २०२२ या काळात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी यात सहभाग घेतला असून त्यातील विजेत्यांचा सत्कार आज करण्यात आला. आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही आमच्या ग्राहकांना हा आनंद देऊ शकतो. त्याबरोबरच आमच्या ग्राहकांचा आमच्या ब्रँडवर असलेल्या विश्वासासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. या पारितोषिक समारंभाला मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व ग्राहकांचे तसेच नागपूरकरांचे आभार मानतो. आम्ही याहीपेक्षा मोठ्या आणि चांगल्या उपक्रमासह लवकरच परत येऊ.”