मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत . 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने त्याचे चाहते खूप दुखी झाले होते. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या अभिनेत्याची आठवण करून देत त्याचे चाहते भावुक झाल्याचे दिसत आहे. दरम्यान सुशांतची जवळची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देखील सुशांतच्या आठवणीत भावुक होत सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
रिया चक्रवर्तीने जवळपास ७ महिन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे . आपल्या पोस्टमध्ये रियाने सुशांत सोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत जे तुम्ही यापूर्वी पहिले नसतील. सुशांत या फोटोमध्ये स्माईल करताना दिसतो आहे. शिवाय सुशांतच्या आठवणीत रियाने पोस्ट करताना म्हंटले आहे की, ” मला प्रत्येक दिवशी तुझी आठवण येते “. रियाने काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात सुशांत आनंदी दिसत आहे. त्याचे हे फोटो पाहून तुम्हालाही सुशांतची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सुशांतच्या अनेक फॅन्सनी देखील रियाच्या या पोस्टला लाईक केले आहे. शिवाय ‘मिस यु सुशांत’ अशा कमेंट्स देखील त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.