नवी दिल्ली – देशातील जुना राजकीय पक्ष असलेला कॉंग्रेस पक्ष लवकरच नव्या नियमासोबत स्वतःचा मेकओव्हर करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे पक्षांच्या नवीन सदस्यांना नवीन नियमांचे पालन करावे लागेल. तर कोणत्याही नेत्याला सार्वजनिक व्यासपीठावरून पक्षविरोधात भूमिका मांडता येणार नसल्याचेही समजते.
सार्वजनिक व्यासपीठावर विधाने करू नयेत यासाठीचे नियम कडक केले जाणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. कॉंग्रेसमध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. पक्षाच्या सदस्यत्व अभियानाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. परंतु पक्षातील खरा बदल संविधानात होणार आहे. कारण 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या पक्षाच्या अध्यक्षतेखाली हे संविधान लिहिण्यात आले होते.
नव्या संविधानात मद्यपान करणे आणि खादी विणण्याच्या अनिवार्यतेच्या नियमांत सवलत दिली जाऊ शकते. सार्वजनिक व्यासपीठावर विधाने करू नयेत यासाठीचे नियम कडक केले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
केंद्रातील सत्तेपासून दूर राहिलेल्या कॉंग्रेसमध्ये मंथनाला सुरुवात झाली आहे. म्हणूनच पक्षाच्या घटनेत परिवर्तन गरजेचे आहे, यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढला आहे. राज्याच्या निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत या मुद्द्यावर मनमोकळी चर्चा झाली. त्यावर सैद्धांतिक सहमतीदेखील तयार झाली आहे. काळानुसार जुन्या झालेल्या नियमांत बदल होणे आणि काही नियमांना कडक करण्याची वेळ आली आहे.
राहुल गांधी म्हणाले, बैठकीत उपस्थित किती लोकांना खादी विणणे जमते? कॉंग्रेस पक्षाचा सदस्य होण्यासाठी 18 वर्षांची अट अनिवार्य असावी. तुम्हाला प्रामाणिकपणे खादी विणता यायला हवी ही दुसरी अट आहे. मद्यपानापासून दूर राहावे या गोष्टींचे पालन करू शकलो नसल्याचे बैठकीत उपस्थित 60 टक्के लोकांनी मान्य केले.
दीर्घ मंथनानंतर पक्षाच्या संविधानात बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यावर सहमती झाली. त्यानुसार नियमांत काळानुरूप बदल केले जातील.