Sunil Shetty Statement| अभिनेत्री दीपिका पदूकोनने काही दिवसांपूर्वीच आई होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर आता सुनील शेट्टी यांची लेक आथिया शेट्टीच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगली आहे. याला कारण ठरले सुनील शेट्टी यांनी केलेले एक विधान…
सुनील शेट्टी सध्या ‘डांस दीवाने’ रिऍलिटी शोचे जज म्हणून काम करत आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील या शोची जज आहे. या रिऍलिटी शोमध्ये सुनील शेट्टी यांनी लेक अथिया शेट्टी हिच्याबद्दल असं काही सांगितलं, ज्यामुळे सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या शोचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये होस्ट भारती सिंह, सुनील शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. भारती म्हणते, ‘सुनील सर तुमच्या मुलीला बाळ होणार तुम्ही आजोबा होणार…’ यावर सुनील शेट्टी ‘मी पुढच्या सीझनमध्ये जेव्हा येईल तेव्हा आजोबांप्रमाणे येणार…’ असे विधान करतात. Sunil Shetty Statement|
सुनील शेट्टी यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अथिया शेट्टी हिने 23 जानेवार, 2023 मध्ये क्रिकेटपटू के.एल. राहुल याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांचं लग्न सुनील शेट्टी यांच्या फार्महाउसमध्ये झालं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते.
Sunil Shetty Statement|
अथिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अथियाने ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अथिया अनेक सिनेमांमध्ये झळकली परंतु तिला फारसे यश मिळू शकले नाही. सध्या ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.
हेही वाचा:
स्वप्नील आणि प्रार्थना पुन्हा दिसणार एकत्र; ‘या’ नव्या चित्रपटाची झलक समोर