आरक्षणाच्या चर्चेचे आव्हान मोहन भागवत स्वीकारतील का ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आता आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे. त्यावर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

डॉ.मोहन भागवत यांनी दिल्लीत स्पर्धा परिक्षांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ज्ञान उत्सव या कार्यक्रमात आरक्षणाचा मुद्द्यावर बोलले. यावेळी ते म्हणाले की,’आरक्षणाचे समर्थन करणारे आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांदरम्यान सुसंवाद व्हायला हवा. आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्यांनी आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन आपली मते मांडायला हवीत, तसेच विरोध करणाऱ्यांनाही समर्थन करणाऱ्यांची बाजू ऐकायला हवी’ असेही ते म्हणाले होते.

यातच मिळलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान देत म्हटले की,’प्रसारमाध्यम आणि संबंधित पक्षांसमोर मी त्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान देतो. जातिव्यवस्थेमुळे आम्हाला जे काही सहन करावं लागतं ते आम्हाला मांडायचे आहे. भागवत यांनी चर्चेला आलं पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.