India finds lithium | जगभरात सर्वत्र लिथियमचे साठे शोधले जात आहेत. हे इतके महत्त्वाचे आहे की त्याला 21 व्या शतकातील इंधन असेही म्हटले जाते. अशात जम्मू आणि काश्मीरमध्ये 59 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. एवढ्या मोठ्या लिथयमच्या खजिन्याने भारत लवकरच जगातील तिसर्या क्रमांकाचा लिथियम उत्पादक देश ठरेल. लिथियमचा सर्वात जास्त वापर इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. ज्या गतीने जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी, उत्पादन आणि विक्री वाढत आहे, ते पाहता हे लिथियमचे साठे भारतातच्या अर्थिक विकास मोठी भूमिका निभावेल यात शंका नाही.
लिथियम म्हणजे काय ?
लिथियम हा मऊ आणि चांदीसारखा पांढरा धातू आहे. हे मुख्यतः रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीसाठी वापरले जाते. यामुळे काहीवेळा याला मव्हाइट गोल्डफ असेही म्हटले जाते.
वापर
-लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या गॅझेटट्सच्या बॅटरीमध्ये
– अॅल्युमिनियम आणि मॅग्नेशियमसह मिश्रधातू तयार करण्यासाठी
-अॅल्युमिनियम-लिथियम मिश्रधातूंचा वापर सायकल फ्रेम्स, विमाने आणि हाय-स्पीड ट्रेनमध्य केला जातो.
-लिथियमचा उपयोग मूड स्विंग आणि बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी देखील केला जातो.
या देशांतून होते आयात
लिथियमचा सर्वात मोठा साठा चिलीमध्ये 9.3 दशलक्ष टन आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 6.3 दशलक्ष टन, अर्जेंटिनामध्ये 2.7 दशलक्ष टन आणि चीनमध्ये 2 दशलक्ष टन लिथियम तयार होते. भारत आपल्या गरजेच्या 96 टक्के लिथियम आयात करतो. भारत चीनमधून सर्वाधिक लिथियम आयात करतो. जे संपूर्ण आयातीच्या 80 टक्के आहे.
आयातीवरील खर्च
2020-21 या वर्षात भारताने लिथियम आयन बॅटरीच्या आयातीवर 8,984 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच वेळी, 2021-22 मध्ये लिथियमच्या आयातीवर 13,838 कोटी रुपये खर्च करण्यात आले. अशा धातूंमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हियाच्या खाणींमधील हिस्सा विकत घेण्यावरही काम करत आहे.
लिथियम साठ्याचा फायदा
सध्या भारत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चिली, चीन, अर्जेंटिना आणि बोलिव्हिया येथून 96 टक्के लिथियम आयात करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लिथियमच्या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन द्यावे लागते. आता भारतातच लिथियमचा साठा उपलब्ध झाल्याने भारताचा परकीय चलन खर्च वाचेल. यासोबतच भारत लिथियमची निर्यात करून आपला महसूल वाढवू शकेल.
3,384 अब्ज रुपये मूल्य
सध्या 1 टन लिथियमची किंमत सुमारे 57.36 लाख रुपये आहे. भारतात 59 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. अशा परिस्थितीत आज त्याचे मूल्य 3,384 अब्ज रुपये असेल.