इलेक्‍ट्रिक वाहनांना संजीवनी मिळणार

बंगळुरूजवळ सापडला लिथियमचा 14 हजार टन साठा


लिथियम आयातीवरील अवलंबित्व कमी होणार

पुणे – इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या लिथियम बॅटरीतील लिथियम आतापर्यंत केवळ काही देशांत मर्यादित प्रमाणात सापडले आहे. त्यामुळे या वाहनाची किंमत जास्त असते. मात्र, आता भारतातही लिथियमचे खनिज उपलब्ध असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

लवकरच प्रकाशित होणाऱ्या जर्नल करंट सायन्समध्ये संबंधित वैज्ञानिक पी. व्ही. तिरुपती यांनी दिलेल्या माहितीमध्ये भारतामध्ये किमान 14 हजार 100 टन इतके लिथियम असल्याचे म्हटले आहे. बंगळुरुपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या मंड्या येथे हे लिथियम सापडल्याचे बोलले जाते. अणूऊर्जा आयोगाची उपकंपनी असलेल्या ऑटोमिक खनिज विभागाने याबाबत संशोधन केले आहे.

याबाबत तज्ज्ञांनी सांगितले, “आमच्या माहितीनुसार तेथे 20 हजार 300 टन इतके मूळ खनिज आहे. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर 14 हजार 100 टन एवढे लिथियम मिळू शकते. मात्र, ते इतर देशांपेक्षा कमी आहे.’ चिलीमध्ये 80 लाख टन, ऑस्ट्रेलियात 28 लाख टन, अर्जेंटिनामध्ये 17 लाख टन, पोर्तुगालमध्ये 60 हजार टन लिथियम आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.