पारनेर, (प्रतिनिधी) – तालुका दूध संघ सध्या अडचणीच्या काळातून जात आहे. संघ पूर्ववत सुरू करण्यासाठी व संघाला ऊर्जावस्थेत आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन महानंद दूध महासंघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी केले.
राष्ट्रीय डेअरी विकास प्राधिकरण, नवीदिल्ली (एनडीडीबी) चे संचालक तसच महानंद दूध महासंघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्याशी पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघांचे चेअरमन दत्तात्रय पवार, संचालक संदीप ठुबे, दादाभाऊ वारे यांनी तालुक्यातील दूध प्रश्नावर व तालुका दूध संघाच्या विविध अडचणी संदर्भात सविस्तरपणे चर्र्र्रा केली.
मार्च महिन्यात राष्ट्रीय डेअरी विकास प्राधिकरण यांच्याशी मुंबईत होणार्या बैठकीत तालुका दूध संघाच्या वतीने आपण निवेदन सादर करावे, त्याबाबत आपणास सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन राजेश परजणे यांनी शिष्टमंडळाला दिले. दूध संघाच्या संकलनात वाढ करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या.