नवी दिल्ली : लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेंव्हापासून ते आजपर्यंत पक्षाला अध्यक्ष मिळाला नाही. त्यातच आज कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे त्यात पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत होत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बैठकीस कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, नारायण स्वामी यांची उपस्थिती राहणार आहे. तर, राहुल गांधी, सोनिया गांधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. व्ही. वेणुगोपाल कॉंग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांनी आज सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.