राजेंद्र वाघमारे
नेवासा – नेवासा शहरात आम आदमी पार्टीने नुकतीच एक जाहिर सभा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आम आदमी पार्टीच्या झाडूने आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसह स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्याचे संकेत देवून राजकिय धुराडा उडवून तालुक्यात आम आदमी पार्टीच्या झाडूने राजकिय स्वच्छता करण्याचे रणशिंग फुंकले आहे.
नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात तालुक्याचे भूमीपुञ अजित फाटके यांची आम आदमी पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचा नेवासकरांच्यावतीने नागरी सत्कार व जाहिर सभेचे आयोजन केले होते यावेळी आम आदमी पार्टीच्यावतीने नेवासा नगरपंचायतीची निवडणूक लढविण्याचे संकेतही या सत्कार समारंभाप्रसंगी मान्यवरांनी बोलतांना दिले यावेळी आप’चे शहराध्यक्ष संदिप आलवणे यांनी नेवासा शहराची कशी वाताहात झाली ? याला जबाबदार आजी – माजी आमदारांबरोबरच सुज्ञ मतदार असल्याचे सांगून मतदारांना आता आम आदमी पार्टीचा पर्याय खुला राहणार असल्याचे सांगून सुज्ञ मतदारांनी तालुक्यात पसरलेल्या गढूळ राजकिय वातावरण स्वच्छ करण्यासाठी आप’च्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा सल्ला देत या निवडणूकांपासून आम आदमी पार्टी नेवाशाच्या सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे संकेत दिले.
आम आदमी पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके,जिल्हाध्यक्ष राजू आघाव,निवडणूक प्रचार प्रमुख अॅड.सादिक शिलेदार हे तीनही पदाधिकारी तालुक्याचे भूमीपुञ आहेत त्यामुळे आम आदमी पार्टीचे राजकारण जिल्ह्यात करतांना नेवासा तालुक्यापासून सुरुवात केली जाणार अाहे. तालुक्याच्या राजकारणात आजी – माजी आमदारांपासून “ना’राज”‘ असलेले कार्यकर्ते ऐनवेळी दोन्ही नेत्यांकडून तिकीट न मिळाल्यामुळे आयत्या वेळेस नाराज होवून आम आदमी पक्षाकडे धाव घेणार आहेत.
पार्टीची ताकद वाढण्यासाठी पक्षीय पातळीवर राजकिय व्युहरचना आखण्याचे काम जिल्हाध्यक्ष राजू आघाव व निवडणूक प्रचार प्रमुख अॅड.सादिक शिलेदार यांच्या बेरकी नजरेतून सुरु झालेले असून आम आदमी पार्टीला जनतेच्या मनात किती स्थान आहे? हे येत्या निवडणूकीतून स्पष्ट होणार असल्यामुळे आम आदमी पार्टीकडून आपले राजकिय मनसुबे आखण्यात कार्यकर्ते सध्या दंग असल्याचे चिञ सध्या दिसून येत आहे.