नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा मीडियादेखील आता गप्प का?

मुंबई – हाथरस उत्तर प्रदेश येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मृत मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली. याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर हा देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

माध्यमांशी बोलताना त्यांनी अभिनेत्री कंगना राणावतवरही खोचक टीका केली आहे. ते म्हणाले,’‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच काय हा अन्याय? असे बोंबलणारा मीडियादेखील कंठशोष करताना दिसला नाही.. का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी,ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारे नाही. विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही? आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, असे  संजय राऊत यांनी म्हंटले आहे.असे  संजय राऊत यांनी  म्हणाले होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.