मुंबई – आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू ठरलेल्या सुरेश रैनावर यंदाच्या लिलावात अन्याय झाला. त्याला एकाही संघाने खरेदी केले नाही. मीस्टर आयपीएल असे संबोधल्या जात असलेल्या रैनाची गुणवत्ता यंदा कोणताही संघ ओळखू शकला नाही, अशी खंत भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली आहे.
रैनाची आयपीएल कारकीर्द पाहिली तर आश्चर्य वाटते. या स्पर्धेत सर्वप्रथम पाच हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज होती. मात्र, गेल्या मोसमानंतर त्याच्याबाबत आयपीएल संघ मालकांमध्ये इतकी उदासिनता का निर्माण झाली, असा सवालही शास्त्री यांनी केला.