Mrunal Thakur On Fashion| अभिनेत्री मृणाल ठाकूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘फॅमिली स्टार’मध्ये दिसणार आहे. सध्या तिच्या या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
यातच आता मृणालने एका मुलाखती दरम्यान केलेले विधान चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कपड्यांवर खर्च करणं हे व्यर्थ वाटत असल्याचं तिने म्हटलं आहे. याशिवाय ती खरेदीसाठी किती रुपये खर्च करते. याबाबत देखील तिने सांगितले आहे.
काय म्हणाली मृणाल ठाकूर ?
एका मुलाखतीत बोलताना मृणाल ठाकूर म्हणाली की, “शॉपिंगवर जास्त खर्च करण्यावर माझा विश्वास नाही. डिझायनर कपड्यांमध्ये गुंतवणूक करणे मला योग्य वाटत नाही. ट्रेंड गेला तर ते पुन्हा वापरता येत नाहीत. आजपर्यंत मी टॉप खरेदी करण्यासाठी 2 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेला नाही. इतके पैसे खर्च करणेही मला महाग वाटते.” Mrunal Thakur On Fashion|
पुढे मृणाल ठाकूर म्हणते की, “केवळ ब्रँड नावासाठी खर्च करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी आहे. वॉर्डरोबमध्ये क्लासिक स्टेटमेंट कलेक्शन असणे ही चांगली गोष्ट आहे. पण स्टाईलसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करणे म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. या पैशातून खाण्यात, घर घेण्यात आणि वनस्पतींमध्ये गुंतवणूक करण्यात आवडेल.”
दरम्यान, मृणाल ठाकूरचा फॅशन सेन्स चाहत्यांना खूप आवडतो. अगदी साधे पोशाख देखील चांगल्या पद्धतीने कसे कॅरी करायचे हे तिला चांगले माहित आहे. यामुळे ती नेहमीच डिझायनर लुकमध्ये दिसते. Mrunal Thakur On Fashion|
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकापूर्वी काँग्रेसला धक्का! आणखी एका बड्या नेत्याने दिला राजीनामा