पुणे – आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन दिसेल. मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनली आहे. मोबाईल नसताना तुमची कोणती गोष्ट तुमच्यापासून दूर गेली हेच कळत नसल्यासारखे वाटेल. याशिवाय आपण सर्वजण लहानपणापासून पाहत आलो आणि ऐकत आलो आहोत की लोक फोन करताना आणि उचलताना ‘हॅलो’ शब्द उच्चारतात.
मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की लोक फोनवर ‘हॅलो’ का म्हणतात? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फोन उचलताच ‘हॅलो’ हा शब्द का उच्चारला जातो आणि या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? चला, जाणून घेऊया.
टेलिफोनचा शोध
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. बेल यांना 10 मार्च 1876 रोजी टेलिफोनचे पेटंट मिळाले. टेलिफोनचा शोध लागल्यानंतर बेलने सर्वप्रथम त्याचा मित्र वॉटसनला संदेश पाठवला. यामध्ये बेलने ‘मिस्टर वॉटसन इकडे या, मला तुमची गरज आहे,’ असे या संदेशात सांगितले होते. टेलिफोनचे जनक ग्रॅहम बेल फोनवर ‘हॅलो’ ऐवजी ‘अहोय’ म्हणायचे.
टेलिफोनचा शोध लागल्यावर, जेव्हा लोक त्याचा वापर करू लागले, तेव्हा त्यांना सर्वप्रथम विचारायचे की तुम्ही तिथे आहात का? आपला आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकू येत आहे की नाही हे कळावे म्हणून ‘हॅलो’ हा शब्द वापरण्यात आला.
गैरसमजाचे कारण
‘हॅलो’ म्हणण्याचे कारण एक गैरसमज आहे, खरेतर, एकदा थॉमस एडिसनने ‘अहोय’ हा शब्द चुकीचा ऐकला आणि ‘हॅलो’ म्हटले. यानंतर त्यांनी 1877 मध्ये ‘हॅलो’ म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला. पिट्सबर्गच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट अँड प्रिंटिंग टेलिग्राफ कंपनीकडून प्रस्ताव पास झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा त्यांनी प्रथम ‘हॅलो’ हा शब्द वापरला.
त्याच वेळी, एक कारण हे देखील लोकप्रिय आहे की ग्रॅहम बेलच्या मैत्रिणीचे नाव ‘हॅलो’ होते आणि फोन उचलताच त्याने पहिले तिचे नाव घेतले. आज सर्व जग फोन उचलताच ‘हॅलो’ म्हणते, ती थॉमस एडिसनची देणगी आहे.
कारण ‘हॅलो’ (Hello) हा शब्द जुन्या जर्मन शब्द ‘हाला’ (Hala) पासून बनला आहे. हा शब्द जुन्या फ्रेंच किंवा जर्मन शब्द ‘होला’ (Hola) वरून आला आहे. ‘होला’ चा अर्थ ‘कसा आहेस’ असा आहे. आता तुम्हाला समजले असेलच की प्रत्येकजण फोन उचलताच आधी ‘हॅलो’ का म्हणतो