bollywood news – बॉलीवूड असो की साऊथ, बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची टक्कर ही एक सामान्य गोष्ट आहे. पण, जेव्हा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होते, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्या चित्रपटाच्या कमाईवर असते, याचा थेट परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. अशात 2024 मध्ये दोन मोठे चित्रपट चित्रपटांची टक्कर बघायला मिळणार आहे.
यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’. याबाबत चाहते उत्सुक आहेअल्लू अर्जुन बॉलिवूड स्टार अजय देवगणसोबत पंगा घेणार आहे. अशी चर्चाही सध्या सोशलवर सुरु आहे.
‘पुष्पा 2’ 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे आणि त्याच दिवशी अजय देवगणचा ‘सिंघम 3’ही रिलीज होणार आहे. दोघांची रिलीज डेट सारखीच आहे. त्याचवेळी, साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा: द राइज’ हिट झाल्यानंतर, लोक त्याच्या सीक्वल ‘पुष्पा: द रुल’बद्दल खूप उत्सुक आहेत. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण आणि अल्लू अर्जुन यांची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. अशात, 15 ऑगस्ट 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मानणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
‘सिंघम 3’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि अजय देवगण सारखे स्टार्स यात दिसणार आहेत. त्याचबरोबर ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत दक्षिणेतील अनेक मोठे कलाकार दिसणार आहे.