Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या अभिनयाने आणि दमदार अॅक्शनने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणून त्याला ओळखले जाते. त्याच्या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहतात. मात्र सध्या अक्षय कुमार त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
अक्षय कुमारने मुंबई मेट्रोने प्रवास केला आहे. त्याचा प्रवासादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत अक्षयने चेहऱ्यावर मास्क, डोक्यावर टोपी आणि पांढऱ्या रंगाचे शूज परिधान केले होते. मात्र या लुकमध्ये अक्षयला ओळखणे देखील अवघड झाले आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमारने 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी मुंबईत मेट्रोने प्रवास केला आहे. याआधी देखील त्याने 2023 च्या सुरुवातीला ‘सेल्फी’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता इमरान हाशमीसोबत मेट्रोने प्रवास केला आहे. त्यावेळी त्याने चाहत्यांसोबत “मैं खिलाडी तू अनाडी’ या गाण्यावर डान्स केला होता. त्यावेळीही त्याचा मेट्रोतील प्रवासादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो ‘सिंघम अगेन’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. अजय देवगन, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, रणवीर सिंह हे कलाकार देखील झळकणार आहेत. याशिवाय तो वेलकम टू द जंगल, बडे मिया छोटे मिया, हाऊसफुल्ल 5 आणि स्काय फोर्स या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.